नवी दिशा स्पर्धात्मक परीक्षांच्या तयारीची
नवी दिशा स्पर्धात्मक परीक्षांच्या तयारीची…
यूपीएससी आणि एमपीएससी नागरी सेवांमध्ये यश मिळविण्यासाठी केवळ पुस्तकी किडा असून जमत नाही तर त्यासाठी आवश्यक असते ती विश्लेषणात्मक क्षमता आणि एखाद्या विषयाला विविध अंगांनी विचार करण्याची क्षमता ! विश्लेषणात्मक क्षमता विकसित करण्यासाठी आणि एखाद्या विषयाला सर्वांगाने अभ्यासण्यासाठी सहा शिलेदार आपण नेहमी आपल्या सोबतीला ठेवावेत आणि ते म्हणजे- WHY,WHAT, HOW, WHERE , WHEN आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे WAY FORWARD (Solutions). या सहा प्रश्नांच्या माध्यमातून आपल्याला त्या विषयाची परिपूर्ण माहिती मिळते आणि त्याच्याच आधरावर आपल्याला त्या विषयाशी संबंधित समतोल मत बनविता येते. यूपीएससी, एमपीएससी, सीडीएस किंवा एसएसबी परीक्षांविषयी परिपूर्ण माहिती घेवून त्यावर आधारित करीअरचा निर्णय घेताना सुध्दा आपण याच ‘WHY,WHAT, HOW, WHERE , WHEN’ पंचसूत्रीचा आधार घेणार आहोत.
स्पर्धात्मक परीक्षांची तयारी का?
गेल्या काही वर्षांमध्ये डॉक्टर, इंजिनीअर, सीए,कला,विज्ञान,वाणिज्य- या सर्वच शाखांमधील तरुणांचे स्पर्धात्मक परीक्षांमधून करीअर घडविण्याचे प्रमाण वाढत आहे. आपल्या भविष्यातील करीअरचा निर्णय घेताना आपल्या मनात पडणारा पहिला प्रश्न म्हणजे- बाकी खूप साऱ्या करिअरच्या संधी असताना देखील सिविल सर्विसेस किंवा सैन्यदलात अधिकारी बनण्याचेच स्वप्न आपण का बघावे? यूपीएससी अथवा एमपीएससी नागरी सेवा या एकुलत्या एक सरकारी सेवा आहेत ज्या माध्यमातून आपणास- पुरेसा पैसा, प्रतिष्ठा, मानमरातब, पावर किंवा सत्ता आणि सर्वात महत्त्वाचे नौकरीच्या माध्यमातून हजारो लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्याची संधी प्राप्त होते. आपल्या शहरामध्ये शेकडो डॉक्टर्स असतील,हजारो इंजिनिअर्स असतील, हजारो बाकी पदवीधर असतील, पण संपूर्ण जिल्ह्यात एकच जिल्हाधिकारी (आय.ए.एस.) अधिकारी असतो, संपूर्ण जिल्ह्यात एकच पोलीस अधिक्षक (आय.पी.एस.) अधिकारी असतो. आपल्याला त्या लाखांच्या लोकसंख्येमधील वेगळेपण असलेला एक बनायचे असेल, तर तयारी सुध्दा त्याच प्रकारची करावी लागेल आणि म्हणूनच यूपीएससी आणि एमपीएससी परीक्षांमधून निवड होवून आपल्या वयाच्या पंचविशीच्या आतच प्रशासकीय अधिकारी बनण्याचे ध्येय आपण नक्कीच ठेवू शकतो. स्वतःवर विश्वास आणि यशस्वी होण्यासाठी ‘३-डी चे सूत्र’- (Dedicated, Disciplined and Directed Way to Success) आपल्याला आपले ध्येय प्राप्त करून देण्यासाठी नक्कीच फायद्याचे ठरेल.
स्पर्धात्मक परीक्षांची तयारी केव्हा आणि कुठे?
यूपीएससी किंवा एमपीएससी नागरी सेवा परीक्षांची तयारी करण्याचे मनाशी पक्के केल्यानंतर पुढचा महत्वाचा प्रश्न पडतो, तो म्हणजे या परीक्षांची तयारी केव्हा सुरु करावी? कुठल्याही शाखेतील पदवीधर यूपीएससी किंवा एमपीएससी परीक्षा देण्यासाठी पात्र असतात. आपली पदवी परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर बरेचसे विद्यार्थी या परीक्षांची तयारी सुरु करतात आणि ‘प्रथम ग्रासे मक्षिकापाते’ या उक्तीनुसार मुळातच या विद्यार्थ्यांना या परीक्षांची तयारी करण्यासाठी उशिर झालेला असेल आणि त्यासाठीच त्यांनी पदवीच्या प्रथम किंवा द्वितीय वर्षांपासूनच त्यांच्या यूपीएससी, एमपीएससी अथवा सीडीएस स्पर्धात्मक परीक्षांची तयारी सुरु करावी. ‘ Preparation of competitive exams- Earlier, the Better…’ हे तत्त्व आपण या परीक्षांची तयारी करतांना लक्षात ठेवावे.
स्पर्धात्मक परीक्षा म्हणजे खूपच अवघड प्रकार किंवा हे फक्त दहावी, बारावी परीक्षांमध्ये चांगले गुण घेतलेल्या विद्यार्थ्यानाच शक्य आहे- असा मोठा गैरसमज बऱ्याच विद्यार्थ्यांमध्ये असतो. खरे पाहिले तर योग्यवेळी, योग्य मार्गदर्शनाखाली, योग्य दिशेने आपण या स्पर्धात्मक परीक्षांसाठी तयारी केली तर कमी कालावधीमध्ये आणि सर्वोत्कृष्ट यशाचे आपण भागीदार बनू शकाल. त्यामुळेच या परीक्षांची तयारी करण्यासाठी आपण आपल्या अभ्यासाचे तीन टप्प्यांमध्ये नियोजन करावे. पहिला टप्पा म्हणजे- FOUNDATION PHASE. या टप्प्यात आपण अभ्यासक्रमाशी निगडीत सर्व विषयांच्या मुलभूत संकल्पनांचा अभ्यास करावा. या ठिकाणी CONCEPTUAL CLARITY हा आपला उद्देश असावा. NCERT अभ्यासक्रमाची विज्ञान, इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र आणि भारतीय राज्यघटना- यासंबंधित इयत्ता सहावी ते बारावीची पुस्तके आपणांस खूप फायद्याची ठरू शकतील. यांच्या सोबतीला इंडिया ईयरबूक आणि काही मुलभूत विषयावार संदर्भ ग्रंथ आपल्याला अभ्यासता येतील. दुसरा टप्पा – INTEGRATED PHASE, हा आपल्या अभ्यासाचा खोलवर आणि संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण करणारा टप्पा असावा. यांमध्ये विषयावार अभ्यास करून नोटस बनविणे आपल्याला फायदेकारक ठरू शकते. दुसऱ्या टप्प्याच्या शेवटी खरे पहिले तर आपला संपूर्ण अभ्यासक्रम अभ्यासून झालेला असला पाहिजे. तिसरा टप्पा म्हणजे अभ्यासिलेल्या बाबीमधून परीक्षेसाठी जास्तीत जास्त गुण मिळविण्यासाठी केला गेलेला VALUE ADDITION PHASE. या टप्प्यामध्ये भरपूर MCQ सोडविण्याचा सराव, मुख्य परीक्षेतील प्रश्नांची उत्तरे लिहिण्याचा सराव, मॉक इंटरव्यू, चालू घडामोडींचे विश्लेषण,ई. वर जास्तीत जास्त भर द्यावा. एखाद्या विद्यार्थ्याने पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षापासून पद्धतशीरपणे जर या तीन टप्प्यांमध्ये अभ्यास केला तर तो नक्कीच पदवी परीक्षा उत्तीर्ण होताच त्याच्या पहिल्या प्रयत्नातच स्पर्धात्मक परीक्षांमध्ये उत्तुंग यश संपादन करू शकतो.
MGM ICE हा केवळ एक मार्गदर्शन करणारा क्लास नसून, एक सकारात्मक वातावरण आणि योग्य मार्गदर्शन करणारी परिपूर्ण पद्धती आहे. UPSC आणि MPSC Foundation Batch (६ महिने ), Integrated Batch ( १० महिने ), Test Series ( ५ महिने ), Mock Interviews ( २ महिने ), SSB crash course ( २ महिने ), Aptitude Batch ( 3 महिने )– यांसारख्या विविध batches मधून विद्यार्थांना ‘शून्यातून यशाच्या शिखराकडे’ नेण्याचे प्रयत्न केले जातात. गेल्या दोनहून अधिक वर्षांच्या अवधीमध्येच आमचा भावेश शर्मा (UPSC- All India Rank 502); मुलाखतीचे मार्गदर्शन घेतलेला नितीन बघाटे (IPS २०१७) आणि आदित्य मिरखेलकर(IPS, UPSC- All India Rank 155)– लेफ्टनंट कर्नल (डॉ) सतीश ढगे सर यांच्या मार्गदर्शनाविषयी आणि MGM ICE च्या गुणवत्तेविषयी बोलतात. येणाऱ्या काळामध्ये नक्कीच या संस्थेचे शेकडो विद्यार्थी आपआपल्या क्षेत्रात यशाचे उत्तुंग शिखर गाठतील यात काही शंकाच नाही…